१ ते ८ साठी प्रकल्प

१ ते ८ साठी  प्रकल्प


     इ.१ ली ते ८ वी साठी प्रकल्प
इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -
भाषा -:

* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी
,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
* पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
इतिहास व ना.शास्त्र -:
* दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

इयत्ता - ५ वी  विषय  - मराठी प्रकल्प  / उपक्रम  यादी

1) परिसरातील  लोकगीतांचा  संग्रह  करणे 
2) वर्तमानपत्रे    मासिकांतील  चित्रकथांचा  संग्रह करणे
3) आपत्ती व्यवस्था पण  आधारित वर्तमानपत्रातील  कात्रणे  गोळा करणे
4) स्वच्छताविषयक  सूचनापाट्या    घोषवाक्ये  तयार  करणे
5) थोरांचे  जीवनप्रसंग  संकलित  करणे
6) "शेतीची  काम " या  विषयावर आधारित  चित्रसंग्रह तयार  करणे
7) "पाणी "या विषयावर आधारित  कात्रण संग्रह  करणे
8) पाण्याची  बचत  या  विषयावर  घोषवाक्ये  तयार  करणे
9) ५ सणांविषयी माहिती  गोळा  करणे 
10) अवयवांवर  आधारित  म्हणींचा  संग्रह करा व  लिहा
11) जुन्या फाटक्या कपड्यांपासून  दोरीपायपुसणी  तयार  करणे
12) तुम्ही  वाचलेल्या  पुस्तकांवर  आधारित टिपण्णी  करा
13) सणपक्षीप्राणी यांच्यावर आधारित  कविता  मिळवा    संग्रह  करणे
14) विविध  घरांचीइमारतींची  चित्रे  गोळा  करणे 
15) विविध  सणांवर  आधारित  गाण्यांचा  संग्रह  करणे
16) पाच  किटकांची चित्रे  गोळा  करून  माहिती  लिहा 
17) संतांचे अभंग  संग्रह  करा
18) पाच  खेळाडुंविषयी माहिती लिहा.
19) सागरी जहाज व  होडींच्या  चित्रांचा  संग्रह  करणे
20) शैक्षणिक  बातम्यांचा  संग्रह करणे
21) आपल्या परिसरात आढळ्णाय्रा पाळीव प्राण्याची चित्रे गोळा करणे व माहिती संकलीत करणे.
22)भाषा बोलताना वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्द यांचा संग्रह करणे.
23) विविध खेळाची माहीती व खेळाडू ची माहीती जमा करणे.
24) मराठी साहित्यीक लेखक कवी यांच्या पुस्तकांचा संग्रह करणे
25) प्रमाण व बोलीभाषेतील शब्द संकलित करणे
26) जोड़ शब्द महासंग्रह करणे अप्रगत मुलांसाठी
27) देशासाठी बलिदान देणार्या हुतात्म्यांची माहीती गोळा करणे
28) शब्द एक पण दोन अर्थ अशा शब्दांची माहिती गोळा करणे
29) वाक्यप्रचाराचा संग्रह करणे
30) बोधकथा सुविचार यांचा संग्रह करणे
31) सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे.
32) मराठी साहित्यिकांचे पूर्ण नाव व टोपननावांचे संकलन.
33) विरामचिन्हे व त्याचा अचूक वापर याविषयी माहिती मिळवून संकलन करणे.
34) लेखनाचा वेग टप्प्याटप्याने वाढवत नेऊन हस्ताक्षरातील फरकाचे निरीक्षण करणे(किमान 10 पाने दररोज 1पान)
35) अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे
36) विविध सणांची माहिती संकलित करणे
37) प्रश्न तयार करणे
38) नातेवाईकांची मुलाखत घेणे
39) विषयावर शब्द व वाक्ये तयार करणे
संवाद व नाटीका तयार करणे
कृती युक्त
40)आपले मित्र व त्यांचे चांगले गुण स्वभाव यांची यादी करणे.
41) आपल्या वर्गातील वस्तूची निर्मिती व वापर यांची माहिती गोळा करणे
42) ई-पुस्तकांचा संग्रह करा.
43)सूतळीपासून गोंडे तयार करणे.
44)पायपूसणी तयार करणे.
45)सूतळ्या पासून चित्रे तयार करा.
46)जोडशब्दांचा संग्रहवही करा.
47)मराठी कोडी ओळखा पाहू.वर्तमानपत्रातील कात्रणे
48)वर्तमानपत्रातील जाहिरातींचा कात्रणांचा संग्रह करा.
49)शाळेचे किंवा परिसराचे एका दिवसातील घडलेल्या घटनांचे वृतांत आपले वृत्तपत्र म्हणून तयार करा.
50)विनोदी लेखकांची माहिती मिळवा.
51)समाजसुधारकांची माहिती गोळा करा.
52)बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह करा.

53)होळी सणासंबंधीच्या कवितांचा संग्रह करा.

No comments:

Post a Comment

.

अभ्यासक्रमावर आधारित इ-साहित्य पाहण्यासाठी youtube channnel ला अवश्य भेट द्या.

Diksha App प्रचार व गुणवत्ता वाढीसाठी अध्ययन अध्यापनात वापर करावा.

Be creative.